Monday, February 6, 2023

इम्रान खान यांची भारतासाठी प्रार्थना, म्हणाले महामारीशी एकत्र लढावे लागेल

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेजारील देश पाकिस्तानने प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी एका ट्वीटद्वारे भारत आणि जगामधील कोरोना विषाणूशी झुंज देणाऱ्या लोकांना त्वरित ठीक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या महामारीशी लढण्यासाठी एकत्र येण्याचे त्यांनी भाष्य केले आहे. शुक्रवारी देशात तीन लाखाहून अधिक नवीन संसर्ग झाल्याची प्रकरणे नोंद झाली आहेत. तथापि, पाकिस्तानातही काही वेगळे चित्र नाही, दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या विक्रमी पातळीवरही पोहोचली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हंटले आहे की , ‘मला भारतीय लोकांशी एकता व्यक्त करण्याची इच्छा आहे, कारण त्यांना कोविड -१९ च्या धोकादायक लाटेचा सामना करावा लागत आहे. शेजारील देश आणि जगामध्ये या कठीण रोगाचा सामना लोक करीत आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी माझी सदिच्छा आहे. आपल्याला एकत्रितपणे मानवतेच्या विरोधात उभ्या असलेलया या जागतिक आव्हानाला सामोरे जाण्याची गरज आहे.

- Advertisement -

दरम्यान , पाकिस्तानमध्ये कोविड -१९ मुळे आतापर्यंत 16 हजार 999 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या 24 तासांत पंजाबमध्ये सर्वाधिक 98 मृत्यू झाले आहेत. पाकिस्तानी इंग्रजी वृत्तपत्र डॉनच्या मते, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोना संक्रमणाची 7 लाख 90 हजार 16 हजार प्रकरणे नोंदली गेली आहेत.