Imtiyaz Jaleel On Savarkar। सावरकर पळपुटे, अशा पळपुट्यांना आम्ही मानत नाही; इम्तियाज जलील यांचे वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त विधान (Imtiyaz Jaleel On Savarkar) केलं आहे. सावरकर हे पळपुटे होते, अशा पळपुट्याना आम्ही मानत नाही असं त्यांनी म्हंटल आहे. खासदार इम्तियाज जलील हे परभणी या ठिकाणी संविधान गौरव सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाची चिन्हं निर्माण झाली आहेत.

इम्तियाज जलील म्हणाले, आमचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष खासदार असुद्दिन ओवैसी यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपचे 360 खासदारांसमोर सांगितलं कि जर या देशात सर्वात मोठा महापुरुष जन्माला असेल तर ते फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. पण भाजपच्या नेत्यांनी ते मान्य केले नाही. कारण, त्यांच्या मते सावरकर हेच महापुरुष आहेत. पण अशा पळपुट्या माणसाला आम्ही कधीही स्वीकारले नाही आणि स्वीकारणार नाही असं जलील यांनी म्हंटल. जलील यांच्या विधानाचे मोठं राजकीय पडसाद उमटल्याचे दिसत आहे.

जलील यांनी सावरकरांवर केलेल्या या विधानानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी जोरदार पलटवार केला आहे. इम्तियाज जलील यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, ही औरंगजेबाची आणि निजामाची अवलाद आहे. त्यांना वीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असण्याचे कारण नाही. या निजामाच्या औलादींकडे आम्ही लक्ष देत नाही. सावरकर राज्याचेच नव्हे देशाचे दैवत आहेत असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र जलील यांच्या विधानानंतर भाजपवर शंका व्यक्त केली आहे. इम्तियाज जलील आणि भाजपचे अंतर्गत संगनमत आहे. त्यामुळे भाजपने त्यांना बोलायला सांगायचे आणि त्यांनी बोलायचं असा प्रकार पहिल्यापासूनच सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.