केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी भारतीय ऑटो उद्योगासाठी एक महत्त्वाची आणि दूरदर्शी घोषणा केली आहे. त्यांच्या मते, 6 महिन्यांच्या आत इलेक्ट्रिक कारची किंमत पेट्रोल कारांइतकीच होईल, जेणेकरून देशातील वाहनप्रेमी अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारू शकतील.
गडकरी यांच्या या घोषणेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या लोकप्रियतेला एक नवा वेग मिळेल, कारण सध्या पेट्रोल कारांच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारांची किंमत जास्त असते, ज्यामुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक कारांचा विचार करत असतानाही ते खर्चाच्या बाबतीत संकोच करत आहेत. 32व्या कन्वर्जन्स इंडिया आणि 10व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्सपो दरम्यान गडकरी यांनी हे महत्वाचे वक्तव्य केले.
गडकरींच्या या घोषणा मुळे भारतातील ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) क्षेत्रात मोठा बदल घडवून आणेल, आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवरील दबाव कमी होईल. “आयात कमी करण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी सरकार ईव्हीला प्रोत्साहन देत आहे,” असे गडकरी म्हणाले. यामुळे देशाच्या आयात बिलात घट होईल आणि पर्यावरणासही मोठा लाभ होईल.
दिल्ली-देहरादून एक्सप्रेसवे
त्यांच्या भाषणात आणखी एक महत्त्वाची घोषणा होती – दिल्ली-देहरादून एक्सप्रेसवेच्या 212 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे बांधकाम आगामी तीन महिन्यांत पूर्ण होईल. हे प्रकल्प देशातील लॉजिस्टिक क्षेत्राला अधिक प्रभावी आणि कमी खर्चिक बनवण्यास मदत करेल. गडकरी यांनी स्पष्ट केले की, “स्मार्ट शहर आणि स्मार्ट ट्रांसपोर्टसाठी सरकार नेहमीच काम करत आहे.” गडकरी यांचे म्हणणे आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेला तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा अत्यंत आवश्यक आहे. “चांगले रस्ते बनवून लॉजिस्टिक खर्च कमी होऊ शकतो आणि त्याचा थेट फायदा सामान्य लोकांना होईल,” असेही ते म्हणाले.
भारताच्या विकास प्रक्रियेत इलेक्ट्रिक वाहने आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत, आणि गडकरी यांच्या या घोषणेसोबत, भारत एक नव्या युगात प्रवेश करणार आहे, जिथे वाहतूक क्षेत्राचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे.