हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुलढाणा येथे एका गरोदर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही अर्भक असल्याचं सोनोग्राफी मध्ये समजले होते. त्यामुळे हा विषय जोरदार चर्चेत होता. शस्त्रक्रिया करून हे ऑपरेशन करण्याचा निर्णय हॉस्पिटलने घेतला . पण हे ऑपरेशन करताना डॉक्टरांना धक्कादायक गोष्ट समजली , ती म्हणजे 3 दिवसांच्या बाळाच्या पोटात 1 नाही तर 2 अर्भकं आहेत. तर चला या घटनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात .
1 तास शस्त्रक्रिया चालली –
या 3 दिवसांच्या बाळाच्या पोटात 2 अर्भकं होती . हि अर्भकं काढण्यासाठी जवळपास 10 ते 12 डॉक्टर आणि नर्स उपस्थिती होत्या . हि शस्त्रक्रिया 1 तास चालली, डॉक्टरांनी हे दोन्ही अर्भक बाळाच्या पोटातून बाहेर काढले आणि या बाळाला जीवनदान दिले. सरकारी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर बाळाला वाचवल्याबद्ल त्याच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले.
‘हा’ वैद्यकीय क्षेत्रातील मोठा चमत्कार –
गेल्या काही दिवसापूर्वी महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान हि घटना समोर आली. शस्त्रक्रियेसाठी बाळाला अमरावतीच्या सेवा केंद्रात दाखल करण्यात आले. हे गुंतागुंतीचं ऑपरेशन असल्याने डॉक्टरकडून विशेष काळजी घेण्यात आली. ही शस्त्रक्रिया म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील मोठा चमत्कार मानला जात आहे. कारण अशी घटना देशात पहिलांदाच घडली आहे . डॉक्टरांच्या या यशस्वी कामगिरीमुळे सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक केले जात आहे.




