रागात येऊन सुनेने लावली थेट सासऱ्याच्या बेडला आग; खळबळजनक Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या समाजात आजवर सासू सासऱ्यांकडून सुनेवर जाच केल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सून आपल्या सासऱ्यासोबत अमानुष वागणूक करताना दिसत आहे. या सुनेने थेट आग लावून आपल्या सासऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे.. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे संबंधित सुनेविषयी संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, तिच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की, एक सून रागात येऊन थेट बेडवर झोपलेल्या सासऱ्याच्या चादरीला आग लावते. यानंतर दुसरा व्यक्ती येऊन ही आग विझवतो. यामुळे घरातील सामानाला देखील आग लागते. आपल्याला व्हिडिओ दिसते की, या सुनेचा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत वाद सुरू आहे ज्यामुळे ती रागात येऊन असे कृत्य करते. परंतु तिने या केलेल्या कृत्यावर नेटकऱ्याकडून तीव्र नाराजी दाखवण्यात आली आहे. तसेच, या बाईवर तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी नेटकऱ्यानी केली आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओ दीपिका नारायण भारद्वाज नामक व्यक्तीने x वर शेअर केला आहे. परंतु अनेकांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. तसेच, अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यामुळे या व्हिडिओला लाखोंच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत.