डिसेंबरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही गृहमंत्री अमित शहांना भेटणार; या मुद्द्यावर होणार चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील दुष्काळ मराठा आरक्षण आणि आगामी लोकसभा निवडणुकांचे स्वरूप याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे या प्रमुख नेत्यांमध्ये होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाचे असेल.

सध्या पाच राज्यांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे अमित शहा प्रचारासाठी आणि संघटन बांधणीसाठी व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. मात्र त्यांचे प्रचाराची कामे संपली की दोन किंवा तीन डिसेंबर रोजी त्यांची बैठक महाराष्ट्रातील मंत्र्यांसोबत पार पडणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जातील. अद्याप या बैठकीची तारीख निश्चित झाली नसली तरी अंदाजे दोन किंवा तीन डिसेंबरला ही बैठक पार पडू शकते.

दरम्यान, मधल्या काळात राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चिगळला होता. त्यामुळे याचे परिणाम आगामी निवडणुकांवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्वाचे म्हणजे, अजूनही मराठा आरक्षणावर तोडगा निघाल्या नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. त्यापूर्वीच दोन ते तीन डिसेंबर दरम्यान एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक अमित शहा यांच्यासोबत होणार आहे. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो.