भाजीपाल्याच्या टेम्पोमधून सुरू होती गोमांस तस्करी, पोलिसांनी ‘अशा’ प्रकारे केला पर्दाफाश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये भाजीपाल्याच्या पिकअप टेम्पोमध्ये नाशिकवरून मुंबईला विक्रीसाठी जाणारे सुमारे दोन हजार किलो गोमांस (seized beef) कल्याण कोळसेवाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पिकअप चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव इम्तिहाज फैयाज सय्यद असे आहे. झटपट पैसे कमवण्यासाठी हा आरोपी तस्करीचे काम करत होता.

अशा प्रकारे पोलिसांनी रचला सापळा
नाशिकवरून जोगेश्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस तस्करी (seized beef) होणार असल्याची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे एपीआय उल्हास जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोळशेवाडी पोलिसांनी कल्याण काटे मानिवली नाक्यावर आरोपींची सापळा रचला.

टेम्पोमध्ये गोमांस आढळून आले
काटेमानवली नाक्यावर दबा धरुन बसलेल्या पोलिसांना एक संशयित टेम्पो नाशिककडून मुंबईच्या दिशेने येत असल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी हा टेम्पो थांबवून टेम्पो चालकाची आणि टेम्पोची कसून तपासणी केली. तेव्हा पोलिसांना टेम्पोमध्ये दीड ते दोन हजार किलो गोमांस आढळून आले. यानंतर पोलिसांनी टेम्पोसह हे गोमांस (seized beef) ताब्यात घेतले. तसेच टेम्पो चालकालाही ताब्यात घेतले.

आरोपीची कसून चौकशी सुरु
पोलिसांनी गोमांस तस्करी (seized beef) करणाऱ्या टेम्पो चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपीकडून दोन हजार किलो गोमांस जप्त केले आहे. आरोपी हे गोमांस नाशिकमधून कुणाकडून हस्तगत करत होता आणि मुंबईत कोणाकडे डिलिव्हर करणार होता, याची माहिती पोलिसांना अद्याप समजली असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय