अंगावर गरम पाणी पडून 10 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू (child died) झाला आहे. नाशिकच्या गंगापूर नाका परिसरात हि दुर्दैवी घटना (child died) घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ (child died) व्यक्त केली जात आहे. आवेरा शुभम इंगळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
आवेराच्या अंगावर पाणी सांडल्यानंतर ती गंभीर रित्या भाजली होती तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज अखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू (child died) झाला. जुना गंगापूर नाका परिसरातील राठी आमराई भागात असलेल्या श्री साई अपार्टमेंटमध्ये इंगळे कुटुंबीय राहतात. शनिवारी रात्री आवेरा हिच्या आंघोळीसाठी गरम पाणी भांड्यात काढण्यात आले. मात्र, पाण्यास आवेराचा धक्का लागून गरम पाणी तिच्या अंगावर गरम पाणी सांडले आणि ती मोठ्या प्रमाणात भाजली.

यानंतर तिला कुटुंबीयांनी तातडीने रुग्नालयात दाखल केले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आवेराची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (child died) नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे इंगळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!