सुपने ग्रामपंचायत निवडणूकीत काका- बाबा गट आमनेसामने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
सुपने (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत स्व. आकाराम भाऊ पाटील ग्रामविकास पॅनेल व श्री. संत नावजी महाराज परिवर्तन पॅनेल आमनेसामने उभे आहेत. अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाच्या विरोधात काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे आता निवडणूक चांगलीच रंगतदार स्थितीत असून तालुक्यात चर्चा सुरू आहे. येथे दुरंगी लढत असून 11 जागेसाठी 22 उमेदवार रिंगणात असून सरपंच पदासाठी 2 महिलांच्यात लढत होत आहे. सत्ताधारी स्व. आकाराम भाऊ पाटील पॅनेलमधून लोकनियुक्त सरपंच पदासाठी संगीता कृष्णात पाटील उमेदवार आहेत. तर त्याच्या विरोधात विश्रांती व्यंकटराव पाटील या निवडणूक लढत आहेत.

सत्ताधारी गटातून- सिद्धेश्वर वार्ड क्रमांक- 1- सुहास भीमराव पाटील, संगीता शंकर बडेकर मंदा जगन्नाथ सुतार. अंबाबाई वार्ड क्रमांक- 2 -शहाजी अधिकराव माळी किशोर बाळासो पाटील, वर्षाराणी निवास पाटील. हनुमान वार्ड क्रमांक- 3- सुहास जगन्नाथ पाटील, शुभांगी दीपक पाटील. केदारनाथ वार्ड क्रमांक- 4- आप्पासो हणमंत जाधव, राजश्री अशोक झिंब्रे, सुप्रिया बाजीराव शिंदे. विरोधी श्री संत नावजी महाराज परिवर्तन पॅनेलमधील उमेदवार पुढीलप्रमाणे ः- सिद्धेश्वर वार्ड क्रमांक- 1- जयवंत राजाराम चव्हाण, स्वाती जितेंद्र कांबळे, सोनाली संतोष सुतार. अंबाबाई वार्ड क्रमांक- 2- विजय संभाजी माळी, अमृत शामराव पाटील, अनिता अजित पाटील. हनुमान वार्ड क्रमांक- 3- दादासो रामचंद्र पाटील, प्रतिभा हिंदुराव पाटील. केदारनाथ वार्ड क्रमांक- 4- अजित दिनकर जाधव, विजया आनंद कांबळे, मीनाक्षी अमोल शिंदे.

सुपने ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाकडून बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील तर विरोधी गटाकडून बलराज पाटील, राहूल पाटील हे नेतृत्व करत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 11 पैकी 9 जागा सत्ताधारी गटाने तर विरोधी गटाने अंबाबाई वाॅर्ड क्रमांक -2 मधील 2 जागा जिंकल्या होत्या. तर लोकनियुक्त सरपंच पदी सत्ताधारी गटाने बाजी मारली होती. सुपने गावच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात बरीच उलथापालथ झाली आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून विजयाचा दावा केला जात आहे.

सुपनेत काका- बाबा गट आमनेसामने
सुपने ग्रामपंचायत निवडणुकीत काॅंग्रेसमध्ये दोन गट पडलेले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट विरोधी गटाकडे आहे. तर सत्ताधारी गट अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचे नेतृत्व मानतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर काॅंग्रेसमधील अंतर्गत कलह याठिकाणी मिटलेला नाही, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. नेत्यांची मने जुळलेली असताना आजही काका- बाबा गटातील कार्यकर्ते दुभंगलेले असल्याचे दिसत आहे.