हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनची ओळख होती. मात्र, जगातील महासत्ताक होण्याच्या मार्गावर असलेल्या भारत या देशाने लोकसंख्येच्या बाबतीत आता चीनलाही मागे टाकलं आहे. या गोष्टीला खुद्द संयुक्त राष्ट्रांनीही दुजोरा दिला आहे.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या आकडेवारीनुसार, सध्या भारताची लोकसंख्या चीनच्या तुलनेत 2.9 दशलक्ष अधिक आहे. मात्र, लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला कधी मागे टाकले हे स्पष्ट झालेले नाही. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार, जगाची लोकसंख्या आता 8 अब्जांच्या पुढे गेली आहे.
तर लोकसंखेच्या बाबतीत संयुक्त राष्ट्रांनी दिलेला अहवाल सांगतो की, भारताची लोकसंख्या आता १ अब्ज ४२ कोटी ८६ लाख आहे, तर चीनची लोकसंख्या आता १ अब्ज ४२ कोटी ५७ लाख आहे. अशा प्रकारे दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये २९ लाखांचा फरक आहे. 1950 पासून, संयुक्त राष्ट्र लोकसंख्येची आकडेवारी ठेवते आणि त्यानंतर ही पहिलीच वेळ आहे की भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या मीडिया सल्लागार अण्णा जेफरीज म्हणाल्या, ‘होय, हे स्पष्ट नाही चीनची लोकसंख्या घटू लागली, भारताचा वेग कायम राहिला आहे. या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे की, चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी उच्चांकावर पोहोचली होती आणि आता ती कमी होऊ लागली आहे. त्याच वेळी, भारताची लोकसंख्या सध्या वाढीच्या दिशेने आहे. तथापि, 1980 पासून भारताची लोकसंख्या वाढीचा दर घसरत आहे. याचा अर्थ भारताची लोकसंख्या वाढत आहे, परंतु तिचा दर आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. अहवालात असे म्हटले आहे की भारतातील 25 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वर्षांच्या दरम्यान आहे. याशिवाय 18 टक्के लोक 10 ते 19 वयोगटातील आहेत.
चीनची लोकसंख्या अपेक्षेपेक्षा कमी
चीनची लोकसंख्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं कमी होत आहे. 2022 मध्ये, देशानं अधिकृतपणे सहा दशकांत पहिल्यांदाच लोकसंख्या घट बघितली आहे. दीर्घकाळाचा विचार केल्यास, यूएन तज्ज्ञांच्या मते, 2050 पर्यंत देशाची लोकसंख्या 109 दशलक्षानं कमी होईल. हे प्रमाण 2019 मधील अंदाजापेक्षा तिपटीनं कमी आहे.
चीन भारतीयांपेक्षा जास्त काळ जगतो
10 ते 24 वयोगटातील लोकांची संख्या 26 टक्क्यांच्या जवळपास आहे. देशातील ६८ टक्के लोकसंख्या १५ ते ६४ वयोगटातील आहे. आणि ७ टक्के लोकांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, चीनमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची लोकसंख्या 14 टक्के आहे. चीनमधील लोकांचे आयुर्मान भारताच्या तुलनेत चांगले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. चीनमध्ये महिलांचे आयुर्मान ८२ वर्षे आणि पुरुषांचे ७६ वर्षे आहे. याशिवाय भारतातील महिलांचे सरासरी वय ७४ वर्षे आहे, तर पुरुषांचे वय केवळ ७१ वर्षे आहे.