सातारा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत विरोधक – सत्ताधारी एकमेकांत भिडले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या 76 व्या सर्वसाधारण सभेवेळी संचालक मंडळाने विरोधकांची नव्हे तर सभासदांची फसवणूक केली आहे असा आरोप करत विरोधकांनी सभेमध्ये गोंधळ घातला. तसेच सभा मंचकावर जाऊन आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी मात्र विरोधक सभेत दारू पिऊन आल्याचा आरोप केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले. नेहमीप्रमाणे प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सभा ही गोंधळातच पार पडली.

सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 76 वी सर्वसाधारण सभा सातारा येथील साई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती विरोधी सभासद आणि सत्तारूढ आघाडीचे सभासद हे तयारीने सभेला आले होते. सभासदांना दिलेल्या आश्वासनानुसार सत्ताधारी वागत असल्याचा आरोप करत विरोधी शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सभेत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली व तेथूनच गोंधळाला सुरुवात झाली विचारलेल्या एकाही प्रश्नाला सत्ताधाऱ्यांकडून उत्तर मिळाले नसल्याचा आरोप विरोध विरोधी सदस्यांकडून करण्यात आला.

तर सभेमध्ये विरोधी असलेले शिक्षक दारू पिऊन येऊन गोंधळ घातला असल्याचा आरोप शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी सभा मंचकावरून केला त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली आणि गोंधळातच सभेचे कामकाज आटोपण्यात आले दरम्यान सभागृहाच्या बाहेर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे गणेश दुबळे यांनी एटीएमची प्रतिकृती व गुगल पे ची प्रतिकृती सभासदांना देऊन सत्ताधाऱ्यांनी इतर बँकांप्रमाणे एटीएम व गुगल पे ची सेवा आश्वासनाप्रमा सभासदांना उपलब्ध करून दिले नाही याचा निषेध अभिनव पद्धतीने केला.