INDIA च्या सरकारमध्ये राहुल गांधी असते पंतप्रधान; तर ठाकरे आणि सुळेंकडे असती ही मोठी जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापित होईल, अशी दाट शक्यता वर्तवले जात होते. परंतु मोजक्या काही मतांनी NDA पुढे गेल्यामुळे देशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापित झाले. परंतु इंडिया आघाडीचे सरकार आले असते तर कोणाकडे कोणती जबाबदारी सोपवण्यात आली असती? असा प्रश्न आता सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे. याच प्रश्नाचे उत्तरे एआयच्या माध्यमातून आली आहेत. ज्यात सत्तेत आल्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांकडे कोणती जबाबदारी असती याबाबत माहिती दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर यायच्या माध्यमातून बनवण्यात आलेले इंडिया आघाडीच्या खासदारांचे फोटो प्रचंड वायरल होत आहेत. या फोटोच्या माध्यमातून इंडिया आघाडीचे सरकार देशात स्थापित झाले असते तर कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी असते याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पद असते असे एआयने म्हटले आहे. तर शशी थरुर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी असती. डी. के. शिवकुमार हे रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री झाले असते.

त्याचबरोबर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गृहमंत्री बनले असते. काँग्रेसच्या सचिन पायलेट यांच्याकडे नागरी उड्डायन मंत्रालयाची जबाबदारी असती. काँग्रेसच्या अभिषेक सिंघवींकडे कायदा आणि न्याय मंत्रालयाची जबाबदारी असती. अखिलेश यादव यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय असते. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश रेल्वे मंत्रीपद असते. तेजस्वी यादव यांच्याकडे संरक्षण मंत्रालय असते. दिपेंद्र हुड्डांकडे अर्थमंत्रालय असते.

इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडे महिला व बालविकास मंत्रालय सोपवले असते. टीएमसीच्या अभिषेक बॅनर्जींना युवा व क्रीडा मंत्रालय असते. टीएमसीच्या युसूफ पठाणकडे अल्पसंख्यांकं मंत्रालयाची जबाबदारी असती. प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीकडे शिक्षण मंत्रालय असते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी कृषी व कृषी कल्याण मंत्रालय असते. अशी माहिती AI च्या फोटोतून देण्यात आली आहे.