औरंगाबाद – औरंगाबाद शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तराची बँकांची बैठक शहरात हॉटेल ताज येथे 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. यामुळे शहरातील DMIC प्रकल्पाला मोठा फायदा होवू शकतो अशी माहिती पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर, किशोर धनायवत, जालिंदर शेळके, राजेश मेहता उपस्थित होते.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री डॉ. कराड म्हणाले या बैठकीचा उद्देश आहे पंतप्रधान जनधन योजना प्रभावीपणे राबवावी, नव उद्योजकांना पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेतून 50 हजार पासून 10 लाख रुपये कर्ज दिले जाते याबाबत बैठकीत चर्चा होईल. डिजिटल मनी ट्रान्सफर मध्ये अधिक गती, केंद्र सरकारने डिएमआयसी प्रकल्पासाठी तीन हजार कोटीचा निधी दिला. काही नवीन उद्योग येथे कशे आणता येतील यामुळे शहराच्या विकासासाठी फायदा होईल यासाठी बैठकीत प्रेझेंटेशन करुन केंद्रीय अधिका-यांना याची माहिती मिळावी व नवीन उद्योग आणण्याचा उद्देश आहे. शेतक-यांनी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी येणाऱ्या अडचणी या विषयावर सुध्दा या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतले जातील.
या बैठकीत राष्ट्रीय स्तरावरील सर्व बँकांचे चेअरमन, सिईओ, अर्थ खात्याचे एडीशनल सेक्रेटरी, नाबार्डचे चेअरमन, डिएमआयसीचे संचालक अभिषेक चौधरी, निती आयोगाचे संचालक व उच्च अधिकारी उपस्थित राहणार आहे. बैठक झाल्यानंतर उद्योजक, बँकर्स, व्यवसायिकांशी चर्चा घडवून आणली जाईल अशी माहिती कराड यांनी दिली आहे.