पाटण शिक्षक सोसायटी निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा 17 जागांवर दणदणीत विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक पार पडली असून यात परिवर्तन पॅनेलने 17 पैकी 17 सर्व जागा जिंकल्या. परिवर्तन पॅनेलच्या विजयानंतर उमेदवारांनी गुलाबाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

या ठिकाणी पार पडलेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलमधील रमेश महेकर, जयसिंग कदम, दत्तात्रय जगताप, संतोष काटकर, गणपत भालेकर, विनायक चव्हाण, विठ्ठल सपकाळ, कुमार यादव, विलास शिर्के, सूर्यकांत मोकाशी, सुनील वायचळ, विजया आवारे, सौ. जयश्री तोडकर, सौ. भारती साठे, रमेश पोतदार, प्रवीण वडगावकर, प्रवीण आगाणे या संचालकांचा विजय झाला.

परिवर्तन पॅनल प्रमुख व सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र जानुगडे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे तयावेळी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पाटण तालुका प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शिक्षक समिती, तालुका शिक्षक भरती, तालुका केंद्रप्रमुख व पदवीधर संघटना आदींनी सहकार्य केले.