कोल्हापूरात सकाळी तणाव अन् कराडात पोलिसांचं रात्री संचलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथे औरंगजेबाच्या समर्थनार्थ ठेवलेला स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने संतप्त पडसाद उमटले. हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात बुधवारी (दि.७) सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पोलिसांकडून शहरातून संचलन करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पोलिसांनी संचलनास सुरुवात केली. यावेळी शेख यांच्याबरोबर डीवायएसपी अमोल ठाकूर, डीवायएसपी बी. आर. पाटील, पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे, सपोनि सरोजिनी पाटील यांच्यासह कराड शहर व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस जीप, व्हॅन सहभागी झाल्या होत्या.

यावेळी दत्त चौकातून पोलीस संचलनाला सुरुवात झाली. पोलीस जीपवरील सायरन वाजवत पोलिसाचे संचलन मुख्य बाजारपेठेतून करण्यात आले.