फलटणला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | आय. आम. ए (इंडियन मेडिकल असोसिएशन) च्या फलटण शाखेच्या नविन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ फलटण येथे डाॅ. जोशी हॅास्पिटल सभागृहात पार पडला. यावेळी आय. एम. ए फलटण शाखेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते डॉ. संजय राऊत तर उपाध्यक्षपदी डॉ. संपत वाघमारे व डॉ. संतोष गांधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाला आय. एम. ए महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, सचिव डॉ. संतोष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इलेक्शन कमिशनचे चेअरमन डाॅ. अविनाश भोंडवे, माजी स्टेट आयएमए अध्यक्ष व बारामती आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, डिझास्टर कमीटी चेअरमन व माजी स्टेट आयएमए उपाध्यक्ष डाॅ. अमरसिंह पवार, महाराष्ट्र आयएमएचे जॅाईंट सेक्रेटरी डॉ. वैभव चव्हाण, सेंट्रल वर्किंग कमिटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. दोशी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

नवनिर्वाचित पदाधिकारी निवडीत ः- सचिव पदावर डॉ. सागर माने, उपसचिव डॉ. जनार्दन पिसाळ, खजिनदारपदी डॉ. विक्रांत रसाळ, तसेच महिला विंगसाठी उपाध्यक्ष म्हणून डॉ. सौदामिनी गांधी, चेअरमनपदी डाॅ. सुनिता पोळ व सचिवपदी डाॅ. संजीवनी राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. कुटे व इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. फलटण आयएमए शाखा ही महाराष्ट्रामध्ये फलटणचे नाव उंचावेल असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमास आयएमएचे सर्व लाईफ मेंबर डॉक्टर तसेच नवीन सभासद उपस्थित होते.