उत्पन्नवाढीसाठी ST चालक-वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्याच्या कानाकोपऱ्यात आजही लालपरी म्हणजे परिवहन महामंडळाची एस.टी. आपले काम चोख बजावत आहे. राज्यातल्या दुर्गम भागात इतर वाहनांपेक्षा एसटी ने प्रवास केला जातो. मात्र मागच्या काही वर्षांपासून प्रवाशांनी एसटी कडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला आहे. एस टी चे उत्पन्न वाढवण्यासाठी परिवहन महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत.

एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. आता एसटीच्या प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्ट पेक्षा वाढीव उत्पन्नांपैकी 20 टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना समसमान वाटण्यात येणार आहे. ही भत्याची रक्कम चालक वाहकांना त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.

ऑगस्ट महिन्यात 16 कोटींचे उत्पन्न

राज्यभरातल्या ज्या आगारांमध्ये तोटा निदर्शनास येत आहे अशा आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. इंधन बचतीसाठी चालक आणि तांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळांना ऑगस्ट 2024 या महिन्यात 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये नफा मिळवलाय उत्पन्न वाढीतील सातत्यासाठी चालक-पाहक हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून त्याची कामगिरी चांगली व्हावी त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना महामंडळाने सुरू केली आहे.

चालक वाहकांना प्रोत्साहन भत्ता

प्रवासी तक्रार, प्रवाशांशी केलेले गैरवर्तन, अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गांचा वापर केल्यास संबंधित चालक वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाहीत असेही महामंडळाने स्पष्ट करा त्यामुळे योग्य कामगिरी करणाऱ्या चालक वाहकांना रोख स्वरूपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास सदर योजना पुढे चालू ठेवण्याचा महामंडळाचा मानस आहे.