बिबट्या-कुत्र्याची झुंज CCTV मध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील काले येथील रहिवाशी असलेल्या संतोष पाटील आप्पा यांच्या कुत्र्यावर शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने बिबट्याबरोबर चांगलीच झुंज दिली. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काले, ता. कराड येथील गावाबाहेर संतोष पाटील यांचे घर आहे. त्यांचे घर असलेल्या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षांपूर्वी संतोष पाटील यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. यावेळी कुत्र्याने बिबट्याला पळवून लावले होते. या घटनेची पुनरावृत्ती शनिवारी पाहायला मिळाली.

शनिवारी रात्रीच्यावेळी संतोष पाटील व त्यांचेकुटूंबीय घरामध्ये झोपले होते. यावेळी त्यांच्या घरासमोर बिबट्या आला. या बिबट्याने पहाटे झालेल्या या झुंजीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घातलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.