व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! ठाण्यात कॉलेजला जाणाऱ्या मुलीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणे स्टेशन रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रिक्षाचालकाने एका तरुणीचा विनयभंग (molesting) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने संतापजनक कृत्य केल्यानंतर तिला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला रिक्षाचालकाने फरफटत नेलं. संबंधित घटना (molesting) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय घडले नेमके?
पीडित तरुणी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजला जात होती. यावेळी आरोपी रिक्षाचालक तिथे आला आणि त्याने तरुणीला इशारे करत तिची छेडछाड (molesting) काढली. यानंतर त्या तरुणीने त्याला विरोध केला असता त्याने त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पीडित तरुणीने पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकाची कॉलर धरुन त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा सुरु करत तरुणीला फरफटत नेले. हि घटना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.

संबंधित प्रकार (molesting) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. विकृत तरुणाने तरुणीला फरफटत नेल्याने ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपी तरुण हा पळून गेला. त्यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी तरुणीला रस्त्यावरुन उठवलं आणि तिची विचारपूस केली. त्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय