तुमच्याही शरीरात हीमोग्लोबिन कमी आहे? आजच आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकालच्या दगदगीच्या जीवनामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अनेकांचे हीमोग्लोबिन कमी असते. त्यामुळे अनेक आजारांना सामोरेही जावे लागते. या आजारांना बळी न पडण्यासाठी तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण शरीरात वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत.

या ७ गोष्टीचा आहारात करा उपयोग

1) पालकात डाळीचा समावेश करा

पालक हा सर्व गोष्टीवरचा रामबाण उपाय आहे. पालकाचे आहारात सेवन केल्याने तुमच्याशी शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढते. आणि आजारांना दूर लोटता येते. पालकांमध्ये मूग डाळीचा समावेश करून त्याची भाजी करून तुम्ही आरोग्याशी असलेल्या समस्येस दूर लोटू शकता.

2) गाजर आणि बिटरूट सॅलेड

गाजर हे जसे डोळ्यांसाठी चांगले असते तसेच ते शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीही मदत करते. तसेच बीटाचे रोजच्या जेवणात सेवन केल्यास तुमचे हिमोग्लोबिन वाढू शकते. गाजर आणि बिटचे सॅलेड करून तुम्ही त्यामध्ये जिरे, लिंबाचा रस आणि मीठ टाकून मिश्रण करून रोज सकाळी खाऊ शकता.

3) डाळिंब आणि खजूराची चटणी

डाळिंब हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यन्त फायदेशीर ठरणारे फळ आहे. तसेच खजूर देखील फायदेशीर आहे. तुम्ही याचा आहारातही समावेश करू शकता. खजूर आणि डाळिंबाची चटणी करून त्याचे सेवन करू शकता. यामध्ये आयर्नचे प्रमाण अधिक असते.

कशी कराल चटणी?

खजूर आणि डाळिंबाची चटणी बनवण्यासाठी तुम्हाला डाळिंब आणि खजूर एकत्रित करावे लागेल. त्याची पेस्ट करून त्यामध्ये लाल मिरची, मीठ आणि जिरे मिसळून त्याचे मिश्रण करून ते जेवणात खाऊ शकता.

4) ड्रायफ्रुट्स

हिवाळ्यात ड्रायफ्रूट्स खाल्ले तर अनेक फायदे होतात. त्यामुळे तुम्हाला जर हिमोग्लोबिनची समस्या असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्सचे लाडू करून खाऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन्सही मिळतात.  त्यामुळे रोज याचे सेवन केल्यास तुमच्या समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकतात.

5) नाचणीची खिचडी

सध्या थंडीचे वातावरण आहे. त्यामुळे आहार हा अधिक चांगला असणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही नाचणीची खिचडी खाऊ शकता. त्यामुळे तुमच्या आरोग्याला चांगला फायदा होऊ शकतो.

6) काळ्या तिळाचे लाडू

तीळ हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे काळ्या तिळाचे लाडू करून खाल्यास तुमचे हिमोग्लोबिन वाढू शकते. आणि रक्ताचे प्रमाणही वाढते. तसेच तुमची इम्यूनिटी बूस्ट होते.

7) पालेभाज्या

पालेभाज्या या तुमच्या शरीरातील सर्व व्हिटॅमिन्सचे प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच यात आयर्नचे प्रमाण यात अधिक असते. यामध्ये तुम्ही पालक, मेथी, शेपू यासारख्या पालेभाज्यांचा आहारात वापर करू शकता.