हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। केंद्र सरकारने कृषी वाहनांना उत्सर्जन मानक टीएम४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून हा मानक लागू होणार आहे. ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, संयुक्त हार्वेस्टर ई. कृषी वाहनांना भारत स्टेज अर्थात बीएस६ वरून हटवून ट्रॅम स्टेज म्हणजे (टीएम४) श्रेणीत सामील करण्यात आले आहे. या वाहनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या उपकरणांनाही कृषी वाहनांच्या पृथक कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेईकल-४ (सीईव्ही) च्या श्रेणी मध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय कार आणि अन्य व्यावसायिक वाहनांवर १ ऑक्टोबर २०२० पासून बीएस-६ मानक लागू होणार आहेत. एवढेच नाही तर बाजारात २०२४ वर्षानंतर टीएम-५ मानक चे ट्रॅक्टर येणार आहेत.
याप्रकारे देशातील लाखो शेतकरी आणि ट्रॅक्टर कंपन्यांना दिलासा मिळू शकणारे आहे. यासाठी रस्ते परिवहन आणि राज्य महामार्ग मंत्रालयाने आपत्ती सूचनेसाठी प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. बाजार तसेच वाहन उद्योगांमध्ये मानक बीएस-६ बद्दल थोडी शंका निर्माण झाली आहे. म्हणून ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, संयुक्त हार्वेस्टर आदी कृषी वाहनांना बीएस-६ श्रेणीत न ठेवता टीएम-४ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. सोबतच याच्या निर्माणासाठीच्या वाहनांना कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेईकल-४ पृथक श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
सध्याच्या काळात युरोप आणि अन्य विकसित देशांमध्ये तीन आणि चार उत्सर्जन मानक सुरु आहेत. तर निर्माण कार्यातील वाहनांवर १ एप्रिल पासून लागू होणाऱ्या उत्सर्जन मानक सीईव्ही-४ वर सहा महिन्यांची सूट देण्यात आली आहे. कृषी वाहनांवर सूट देण्यासाठी कृषी मंत्रालय, ट्रॅक्टर निर्माता आणि कृषी संघटन यांनी मागणी केली आहे. वाढणारे वायुप्रदूषण वेगाने रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. जून पासून खाजगी व्यावसायिकांवर बीएस-६ मानक लागू करण्यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या वाहनांना नारंगी आणि हिरव्या नंबर प्लेट वरून ओळखले जाणार आहे.