महाराष्ट्रातील जनतेला शॉक!! आजपासून वीज बिलात वाढ होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 1 एप्रिल असून आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. मात्र आजच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आजपासून वीज दर महाग झाले आहेत. त्यामुळे आजपासून दर महिन्याला वीज वापरासाठी तुम्हांला अधिक रक्कम भरावी लागणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच MERC ने 1 एप्रिल 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत.

आजपासून विजेसाठी 5-10 टक्के जास्त किंमत मोजावी लागणार आहे. महाराष्ट्रात वीज वितरणच्या प्रामुख्याने चार कंपन्या आहेत. MSEDCL म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड राज्य सरकारद्वारे चालवली जाते. ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची उपकंपनी आहे. महावितरणच्या ग्राहकांसाठी 2023-24 साठी सरासरी 2.9% आणि पुढील वर्षासाठी 5.6% ची वाढ करण्यात आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी महावितरणच्या यूजर्ससाठी निवासी दरात 6% आणि पुढील आर्थिक वर्षात 6% ने वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, उद्योगासाठी 2023-24 मध्ये 1% आणि पुढील आर्थिक वर्षात 4% वाढ होण्याचा अंदाज आहे.

MERC ने 2023-24 साठी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या दरात सरासरी 2.2% आणि 2024-25 मध्ये 2.1% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. 2023-24 मध्ये निवासी टॅरिफ 5% आणि पुढील वर्षी 2% वाढेल. तर दुसरीकडे 2023-24 आणि पुढील आर्थिक वर्षासाठी उद्योगांसाठी मात्र दरामध्ये कोणतीही वाढ होणार नाही.

दुसरीकडे, टाटा पॉवरच्या यूजर्सना आर्थिक वर्ष 2023-24 साठी सरासरी 11.9% आणि आर्थिक वर्ष 2024-25 साठी 12.2% ची वाढ पाहायला मिळेल. तर 2023-24 साठी निवासी दरात 10% वाढ आणि 2024-25 साठी 21% वाढ होईल. उद्योगासाठी लागणाऱ्या विजेच्या दरात आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 17 टक्क्यांनी दर वाढ होणार आहे.