मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्र एक्सप्रेससह काही गाड्यांमध्ये एलएचबी कोच आणि सुधारित संरचना लागू केली जाणार आहे. यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक होईल.
गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर – गोंदिया एक्सप्रेस १ जूनपासून एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह धावेल, तसेच गाडी क्रमांक ११०४० गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस ३ जूनपासून त्याच पद्धतीने चालवली जाईल. या गाडीच्या संरचनेत एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सात शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक गार्ड्स ब्रेक व्हॅन यांचा समावेश आहे.
काय असेल वेळापत्रक ?
याशिवाय, मध्य रेल्वे प्रशासनाने साप्ताहिक विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीमध्ये वाढ केली आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करून, विशेष गाड्यांचे फेऱ्यांचे वेळापत्रक आणि थांबे तसेच संरचनेत कोणताही बदल न करता अधिक वेळासाठी चालवले जातील. विशेष गाड्यांचे वाढीव कालावधी पुढील प्रमाणे आहे:
- बलसाड – दानापूर (गाडी क्र. ०९०२५) २३ जूनपर्यंत
- दानापूर – बलसाड (गाडी क्र. ०९०२६) १ जुलैपर्यंत
- उधना – पटना (गाडी क्र. ०९०४५) २७ जूनपर्यंत
उन्हाळा आणि सुट्टीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे, आणि या निर्णयामुळे विशेष गाड्या प्रवाशांना अधिक सुविधा आणि आरामदायक प्रवास प्रदान करतील.