हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test 2024) यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. यासाठी बांगलादेशचा संघ चेन्नईत दाखल सुद्धा झाला असून कसून सराव करत आहेत. याच दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने (Najmul Hossain Shanto) टीम इंडियाला इशारा दिला आहे. भारतात आम्ही जिंकण्यासाठी आलोय, पाकिस्तान विरुद्धची कसोटी सिरीज जिंकल्यामुळे नक्कीच आमचा आत्मविश्वास वाढला आहे असं नझमुल हसन शांतोने म्हंटल आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना नझमुल हुसेन शांतो म्हणाला की, आम्हाला माहित आहे की, भारत आमच्यापेक्षा चांगला संघ आहे, टीम इंडियाची क्रमवारी आमच्यापेक्षा चांगली आहे, परंतु आमचा प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत विजय खेचून आणण्याचा आणि भारतीय संघाला सहज जिंकू न देण्याचा असेल. आम्ही फार दूरचा विचार करत नाही मात्र आम्ही अर्थातच जिंकण्यासाठी खेळणार आहोत, चांगली कामगिरी केली तरच यश मिळण्याची संधी असते याची जाणीव आम्हाला असल्याचे नझमुल हुसेन शांतोने सांगितलं. IND vs BAN Test 2024
कसे आहेत दोन्ही संघ : IND vs BAN Test 2024
भारताचा संपूर्ण संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
बांगलादेशचा संपूर्ण संघ:
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमेर दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, मोहम्मद. सय्यद खालेद अहमद, जाकेर अली आनिक