बांग्लादेशच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूला शेन वॉर्नचा रेकॉर्ड तोडण्याची संधी; एवढ्या विकेटची आहे गरज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि बांगलादेश यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामान होणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी करो वा मरोचा सामना असणार आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केल्यामुळे आजचा सामना भारताला जिंकणे अनिवार्य आहे. या सामन्यात बांगलादेश टीमचा स्टार गोलंदाज शाकिब अल हसनला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

शाकिब अल हसन याने आतापर्यंत बांगलादेश टीमकडून 222 आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळल्या आहेत. त्यामध्ये त्याने 290 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याने तब्बल 4 वेळा एकाच सामन्यात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. आजच्या मॅचमध्ये शाकिब अल हसनने 3 विकेट घेतल्या तर तो शेन वार्नशी (Shane Warne) बरोबरी करणार आहे तर 4 विकेट घेतल्या तर तो त्यांचा रेकॉर्ड मोडू शकतो. ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नने (Shane Warne) 194 आंतरराष्ट्रीय सामन्यात 293 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये शेन वॉर्नने (Shane Warne) 1 वेळा 5 विकेट तर 12 वेळा 4 विकेट घेतल्या आहेत.

टीम इंडियाची आजची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर,उमरान मलिक.

बांगलादेशची आजची प्लेइंग इलेव्हन
लिटन दास (कर्णधार) मुशफिकर रहीम (यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांतो, अनामूल हक, अफिफ हुसेन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नसूम अहमद, इबादत हुसेन.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट