बुमराह-शमीची रेकॉर्डब्रेक भागीदारी, 39 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

0
30
Bumrah and Shami
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन : वृत्तसंस्था – आज टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा शेवटचा आणि पाचवा दिवस आहे. या पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या अखेरच्या फलंदाजांनी कमाल केली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजीची धुरा ज्यांच्या खांद्यावर असते त्यांनी आज आपल्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला अक्षरक्ष: रडवलं आहे. भारताच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी केली आहे. याचबरोबर त्यांनी 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील एक विक्रम मोडला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1427246702394761222

काय आहे विक्रम?
बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत 77 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. या दोघांनी 66 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताच हा विक्रम मोडीत काढला आहे. भारताकडून लॉर्ड्सवर मदन लाल आणि कपिल देव यांनी 1982 मध्ये 9 व्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली होती. शमी आणि बुमराह या दोघांच्या फटकेबाजीमुळे पाचव्या दिवसातील पहिलं सत्रं भारताच्या नावावर झालं आहे. तसेच सामन्यावरील भारताची पकड मजबूत झाली आहे.

शमीचं इंग्लंड विरुद्ध दुसरं अर्धशतक
मोहम्मद शमीने लॉर्ड्सच्या या ऐतिहासिक मैदानावर षटकार ठोकत आपले अर्धशतक साजरं केलं. कसोटी कारकिर्दीतील शमीचे हे दुसरे अर्धशतक ठरले आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही अर्धशतकं शमीने इंग्लंड विरुद्ध इंग्लंडच्याच मैदानात फटकावली आहेत. याआधी शमीने 2014 मध्ये नॉटिंगघममध्ये अर्धशतक केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here