हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 15 ऑगस्टला देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023)आहे. यानिमित्ताने देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य हे काय सहजासहजी मिळालेलं नाही, त्यासाठी आपल्याला अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. अनेक देशभक्तांना, स्वातंत्र्यसेनानींना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे, बलिदान द्यावं लागलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी आपण सर्व स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण करत असतो. आज आपण अशाच काही स्वातंत्र्यसैनिकांबद्दल जाणून घेणार आहात ज्यांनी भारताला स्वातंत्र्य (Independence Day 2023) मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारला.
महात्मा गांधी (Mahatma Gandhi)-
यामध्ये सर्वात आधी नाव येत ते म्हणजे महात्मा गांधी यांचे.. राष्ट्रपिता हे बिरुद मिळालेल्या महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यावर भर दिला. अहिसेंचे पुजक असलेले महात्मा गांधी कोणतेही काम अहिंसावादी पदधतीने पार पाडायचे. इंग्रजांविरूदध लढाई करताना गांधींनी भारत छोडो आंदोलन केले, सत्याग्रह अशा अनेक चळवळी उभारल्या. गांधींनी नेहमी अहिंसा मार्ग वापरला. अखेर त्यांच्या अहिंसावादी लढयाच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आणि शेवटी 15 आँगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी भारत सोडुन पलायन (Independence Day 2023) केले. परंतु 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने गांधींना गोळ्या मारून त्यांची हत्या केली.
सरदार वल्लभभाई पटेल (Vallabhbhai Patel)-
यानंतर नाव येत ते सरदार वल्लभभाई पटेल यांचे… वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते परंतु महात्मा गांधी यांच्यापासुन प्रेरित होऊन त्यांनीही असहकार चळवळीत भाग घेतला आणि इंग्रजांना जेरीस आणलं. वल्लभभाई पटेल यांनी अहमदाबाद शहरातील ब्रिटीश वस्तुंवर बहिष्कार घातला. तसेच आपल्या ब्रिटीश कपडयांचा त्याग करत स्वदेशी खादीपासुन तयार केलेले कपडे परिधान करणे सुरू केले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले.
सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose)- (Independence Day 2023)
यानंतर आपण नाव घेऊ शकतो ते म्हणजे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे, सुभाषचंद्र बोस हे अहिंसावादाच्या विरोधात होते. ‘तुम मुझे खून दो,मै तुम्हे आझादी दूंगा’ या वाक्याने लाखो तरुणांना संघर्षाची प्रेरणा मिळाली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंदचा नारा दिला आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करणारे नेताजी यांनी ब्रिटिश सैन्यात काम करणाऱ्या अनेक भारतीय तरुणांना आपल्या सैन्यात सामील करून घेतलं आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. त्यांचे आणि गांधीजींचे विचार वेगवेगळे असले तरी ध्येय एकच होत ते म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे परंतु १८ आॅगस्ट १९४५ रोजी तेहाकू येथे एका विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यांचा मृत्यू हे आजही एक रहस्यच बनलं आहे.
भगतसिंह (Bhagat Singh)-
यानंतर आपण नाव घेऊया भगतसिंह यांचे, भगतसिंहांना कोण ओळखत नाही? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत भगतसिंहाचे देशासाठीचे बलिदान माहित आहे. अवघ्या २३ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भगतसिंगांने देशासाठी प्राण दिला. भगतसिंग मार्क्सवादी विचारसरणी मानणारे होते. लहान वयातच इंग्रजांविरूदध त्यांनी लढा पुकारला. इंग्रज आपल्या देशावर कशा पदधतीने कब्जा करीत आहे हेच भगतसिंग यांनी देसजातील युवकांना पटवून दिले आणि जावुन सांगुन एक चळवळ उभारली. याच दरम्यान, त्यांनी संसद भवनात बाँम्ब फेकले. या कारणाने 23 मार्च 1931 इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले.
वरील स्वातंत्र्य सैनिकांव्यतिरिक्त, लोकमान्य टिळक, मंगल पांडे, पंडित जवाहरलाल नेहरू, लाला लजपतराय, सुखदेव, राजगुरू, लाल बहादर शास्त्री, चंद्रशेखर आझाद यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सेनानींनी देशासाठी लढा दिला.