व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी हे Top 5 देशभक्तीपर चित्रपट पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला (Independence Day 2023) भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन आहे. यानिमित्ताने देशात उत्साहाचे वातावरण असून अनेक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. आपल्या देशात चित्रपट बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि देशातील जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम अधिक प्रमाणात भिनावे यासाठी अनेक देशभक्तीपर चित्रपट सुद्धा प्रदर्शित करण्यात आलेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड चिंत्रपटांबाबत सांगणार आहोत जी तुम्ही १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पाहू शकता.

Border
Border

1) बॉर्डर (Border) 1997 – Independence Day 2023

यामध्ये एक नंबरला नाव येत ते म्हणजे बॉर्डर या चिंत्रपटाचे…. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित हा चित्रपट जेपी दत्ता यांनी दिग्दर्शित केला आहे. सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना आणि बरेच काही स्टार अभिनेत्यांनी भाग घेतला आहे. 1997 ला हा देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशात चांगलाच गाजला.

LOC Kargil
LOC Kargil

2) LOC Kargil (2003)-

LOC Kargil हा चित्रपट २००३ प्रदर्शित झाला. जेपी दत्ता यांनीच हा चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केला होता. कारगिल सेक्टर सामरिकदृष्ट्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानी आक्रमणकर्त्यांविरूद्ध युद्ध लढणाऱ्या भारतीय सैनिकंवर आधारित हा चित्रपट आहे. या चिंत्रपटात संजय दत्त, अजय देवगण, नागार्जुन, सैफ अली खान, सुनील शेट्टी, संजय कपूर, अक्षय खन्ना, अभिषेक बच्चन यांसारख्या स्टार अभिनेत्यांची फौज उतरवण्यात आली आहे. 255 मिनिटांच्या रनिंग टाइमसह, या चित्रपटाने सर्वात जास्त वेळ रनिंग टाइमचा विक्रमही प्रस्थापित केला आहे.

Mangal Pandey: The Rising
Mangal Pandey: The Rising

3) मंगल पांडे: द रायझिंग Mangal Pandey: The Rising (2005)-

थोर स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित ‘मंगल पांडे: द रायझिंग’ हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिर खान, राणी मुखर्जी, अमिषा पटेल, आणि किरण खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमीर खान हे मंगल पांडे यांच्या रूपात आहेत. मंगल पांडे यांचे जीवन आणि ब्रिटिशांविरोधात त्यांनी दिलेला लढा यावर हा चिंत्रपट आधारित आहे. परंतु या चित्रपटातील काही वादग्रस्त सिन मुळे हा चिंत्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

Shershaash
Shershaash

4) शेरशाह Shershaash (2021)

‘शेरशाह’ हा कॅप्टन विक्रम बत्राचा बायोपिक आहे ज्यांनी 1999 मध्ये ऑपरेशन विजयमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. विष्णू वर्धन यांनी हा चिंत्रपट दिग्दर्शित केलाय. सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटात विक्रम बत्रा यांची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावली आहे. आणि त्याला कियारा अडवाणीने सुद्धा जोरदार सपोर्ट केला आहे. कारगिल युद्धात विक्रम बत्रा यांनी 4875 क्रमांकावर देशाचा ध्वज कसा फडकावला? तसेच, डिंपल चीमासोबतची त्याची प्रेमकहाणी कशी वळण घेते? ही या चित्रपटाची मूळ कथा आहे.

Raazi
Raazi

5) राझी Raazi (2018)-

आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला राझी हा चित्रपट सुद्धा सत्य घटनेवर आधारित आहे. एक मुलगी आपल्या सर्व इच्छांचा बळी देऊन देशसेवेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करते आणि पाकिस्तानमध्ये भारतीय गप्तहेर म्हणून काम करते. आलियाचा या चित्रपटातील अभिनय अतिशय भावतोय. दुसरीकडे विकी कौशलने सुद्धा आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत उत्तम काम केले आहे. तुम्ही चिंत्रपट बघत असताना एक क्षणही तुमचं मन इकडे तिकडे जाणार नाही हे नक्की.