Independence Day 2024 | घरातील तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून मिळवा, हर घर तिरंगा सर्टिफिकेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Independence Day 2024 | आपला भारत देश स्वातंत्र्य झालेला उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी 78 वर्षे पूर्ण होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिनाची(Independence Day 2024) जोरदार तयारी चालू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सगळ्या शाळा, कॉलेज, ऑफिस तसेच काही बिल्डिंगमध्ये देखील ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. त्यामुळे प्रत्येक भारतीयसाठी हा दिवस खूप खास असतो. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झालेले आहेत. आणि या दिवशी सगळ्यांनी एकत्र यावे यासाठी नरेंद्र मोदी यांनी एक मोहीम सुरू केली आहे. ती मोहीम म्हणजे हर घर तिरंगा मोहीम.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचा तिसरा टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरू केलेला आहे. ही मोहीम आता 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. तिरंगाला आदरांजली वाहण्यासाठी भारतीय नागरिकांनी एकत्र यावे हा या योजने मागील उद्देश आहे. हर घर तिरंगा या मोहिमेचे हे तिसरे वर्ष आहे. 2022 मध्ये आपण सगळ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. त्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली.

प्रत्येक नागरिकांना त्यांच्या घरात ध्वजारोह तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे तुम्ही उद्या म्हणजे स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2024) तुमच्या घरात ध्वजारोह फडकवू शकता. आणि तुम्ही यासोबत एक सेल्फी देखील अपलोड करू शकता. तुम्ही तुमच्या घरातील तिरंग्यासोबत जर सेल्फी अपलोड केली, तर तुम्हाला हरकती रंगाच्या सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. भारतीय नागरिकाला सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या प्रत्येक घरासाठी हर घर तिरंगा हे सर्टिफिकेट मिळू शकते. म्हणजेच या वर्षीचा तुमचा स्वातंत्र्य दिन आणखी खास होणार आहे.

सेल्फी अपलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा