INDIA आघाडी शरद पवारांवर सोपवणार मोठी जबाबदारी? बैठकीत ठरणार निवडणुकांची रणनीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आणि उद्या मुंबईत इंडिया आघाडीची (India) महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यातील 28 पक्षांचे मुख्य नेते उपस्थित राहतील त्यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील तसेच पक्षाचा चेहरा देखील ठरवला जाऊ शकतो. त्याचबरोबर, या बैठकीमध्ये इंडिया आघाडीकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष आजच्या होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे.

शरद पवारांकडे महत्त्वाची जबाबदारी

इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत संयोजक पदावरही चर्चा होणार आहे. त्यामुळे या पदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र या पदासाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवार या पदाचा स्वीकार करतील का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर शरद पवारांनी हे पद स्वीकारले तर त्यांना आगामी निवडणुकांमध्ये त्याचा मोठा फायदा होईल.

दरम्यान, मुंबईत होणाऱ्या आघाडीच्या बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीवर आहे. सध्या अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यामुळे शरद पवार निवडणुकांसाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे संयोजक पदाची जबाबदारी सोपवण्यात यावी असा विचार आघाडी करत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतेही ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतु आजच्या बैठकीनंतर अनेक महत्त्वाचे निर्णय समोर येतील. जे आगामी निवडणुकांची रणनीती ठरवतील.