भारत-चीन सीमेवर चकमक, एक भारतीय अधिकारी व २ जवान शहीद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लडाख । भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत एक भारतीय अधिकारी व २ जवान शहीद झाले वृत्त समोर येत आहे. भारत सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार,  भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात सैनिकांच्या माघार दरम्यान ही घटना घडली. भारतीय लष्कराचे म्हणणे आहे की, सोमवारी रात्री भारत-चीन सीमेवर असलेल्या लवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यात जोरदार संघर्ष सुरू झाला, ज्यामध्ये एक सैन्य अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले.

भारतीय लष्कराच्या मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, चिनी सैन्यालाही मोठं नुकसान सहन कराव लागलं आहे. मात्र, अद्यापपर्यंत किती चिनी सैनिक मरण पावले आहेत किंवा जखमी झाले आहेत याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

लष्कराच्या मुख्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांचे वरिष्ठ सैन्य अधिकारी या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी सध्या घटनास्थळी बैठक करत आहेत. गलवान खोरं हा भारत चीनच्या लडाख सीमेवरील प्रदेश आहे. अलीकडे या भागात चिनी सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”