India Electronics Bharati 2024 | जे विद्यार्थी सरकारी नोकर भरतीची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता एका नवीन विभागातून मेगा भरती निघत आहे. आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ही नवीन भरती भारत इलेक्ट्रॉनिक अंतर्गत केली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या अधिसूचनेनुसार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत मेगा भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.
यामध्ये तुम्हाला नोकरीची चांगली संधी आहे या भरतीमध्ये तब्बल 517 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करून एक चांगली नोकरी मिळू शकता. आणि तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. आता या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया
पदांचा तपशील
या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये 517 जागांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमची बीई, बीटेक किंवा अभियांत्रिकी शाखेत पदवी असणे, खूप गरजेचे असते. केवळ याच विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
वेतन | India Electronics Bharati 2024
जर तुमची निवड भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत झाली, तर त्या उमेदवाराला दर महिन्याला 35 हजार रुपये पगार मिळणार आहे.
वयोमर्यादा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 28 वर्षे असणे खूप गरजेचे आहे. 28 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
अर्ज शुल्क
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 125 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. त्यास आणखी 15 टक्के जीएसटी देखील येणार आहे.
अर्ज प्रक्रिया
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही 13 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकता. कारण 13 मार्च अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.