संपुर्ण देश २१ दिवसांसाठी लाॅकडाउन, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | कोरोनाशी लढा चालू असताना भारतीयांनी जनता कर्फ्युनिमित्त दाखवलेली शांतता आणि संयमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रभावावर नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री आयोजित केलेल्या संवादात भाष्य केलं. सोशल डिस्टन्स पाळणे हाच कोरोनाशी लढण्यासाठी जालीम उपाय असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं.

राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत लागू केलेली संचारबंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे संपूर्ण देशात २१ दिवसांची संचारबंदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मध्यरात्रीपासून लागू केली आहे. कोरोना – कोई रोड पे ना निकले अशा आशयाचा संदेश मोदींनी यावेळी दिला.

मी तुमचे काही दिवस मागण्यासाठी पुन्हा येणार आहे असं मी मागेच म्हटलो होतो याचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा दाखला यावेळी दिला. कोरोनाचे संक्रमण पहिल्या लाखभर लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ६७ दिवस लागले मात्र पुढील लाखभर लोकांपर्यंत पोहचण्यासाठी केवळ ११ दिवस लागल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.

  • महत्वाचे मुद्दे –
    आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाउन
    हा लॉकडाउन कर्फ्यूपेक्षा कमी नसेल
    कोरोनाशी लढण्यासाठी १५ हजारांचे पॅकेज
    २१ वर्षे घरात रहा अन्यथा देश २१ वर्ष मागे जाईल

 

देशातील सर्व राज्य, सर्व जिल्हे, सर्व गावे लाॅकडाऊन