व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भारताचे स्वप्न भंगले; इंग्लंडकडून 10 गडी राखून दारुण पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. इंग्लंड कडून तब्बल 10 गडी राखून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारतीय संघाला बसला. आता पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 6  गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 63 धावा केल्या तर विराट कोहलीने 50 धावा बनवल्या. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची अपयशाची मालिका या सामन्यातही कायम राहिली. त्याचा फटका भारतीय संघाला बसला.

169 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवाती पासूनच आक्रमक पवित्रा घेत भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. बटलरने अवघ्या 49 चेंडूत 80 धावा केल्या तर दुसरीकडे अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत 86 धावा कुठल्या. भारतीय गोलंदाजांना इंग्लंडचा एकही फलंदाज बाद करता आला नाही. या पराभवामुळे भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. आता फायनल मध्ये इंग्लंडचा सामना पाकिस्तानसोबत होईल.