Trade in Rupees : खुशखबर !!! आता पहिल्यांदाच भारतीय रुपयांत होणार परदेशी व्यापार, भारत-मलेशियामध्ये झाला मोठा करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Trade in Rupees : भारतीय नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण आता पहिल्यांदाच भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापार हा भारतीय रुपयांमध्ये केला जाणार आहे. याबाबत या दोन्ही देशांमध्ये नुकताच व्यापारी करार करण्यात आला आहे. ज्यामुळे आता भारतीय चलनाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढण्यात मदत होणार आहे. हे लक्षात घ्या कि, भारत आणि मलेशिया यांच्यातील या व्यापारी करारानंतर आता भारतीय चलनाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे.

India, Malaysia can now trade in Indian rupee - The Hindu BusinessLine

RBI ने घेतला पुढाकार

जुलै 2022 मध्ये RBI कडून विदेशी व्यापारामध्ये भारतीय रुपयाचा वापर सुरू करण्यात आला होता. RBI च्या या पुढाकारानंतरच भारतीय रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. RBI च्या या पुढाकारानंतर आता भारतीय रुपयामध्ये जागतिक व्यापार करणे शक्य होईल, ज्यामुळे भारतीय रुपया आणखी मजबूत होण्यात मदत होईल. हे जाणून घ्या कि, भारत हा मलेशियामधून पाम तेल आयात करणारा प्रमुख देश आहे. Trade in Rupees

India, Malaysia can now trade in Indian rupee - The Economic Times

मलेशियन बँकेसोबत केला सामंजस्य करार

यासाठीची संपूर्ण सिस्टीम क्वालालंपूर येथील इंडिया इंटरनॅशनल बँक ऑफ मलेशियाने तयार केली आहे. ज्यामध्ये विशेष रुपी व्होस्ट्रो खाती उघडण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. तसेच भारतातील संबंधित बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ही खाती उघडता येऊ शकतील. परराष्ट्र मंत्रालयाकडून नुकतेच एका अधिकृत निवेदनात याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच याविषयीचे संपूर्ण तपशील देखील इंडिया इंटरनॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. Trade in Rupees

India, Sri Lanka mulling over using Indian rupee for bilateral trade - EasternEye

भारताने तयार केले नवीन परकीय व्यापार धोरण

शुक्रवारी भारताकडून नवीन विदेशी व्यापार धोरण 2023 लाँच करण्यात आले आहे. या अंतर्गत भारताची निर्यात 2030 पर्यंत US$ 2 ट्रिलियनच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, भारतीय चलनामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे. सध्या भारत सरकार कडून रुपयाला आंतरराष्ट्रीय चलन बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ज्यासाठी ही सिस्टीम खूपच फायद्याची ठरणार आहे.

Indian rupee weakness, hitting fresh lows amid global headwinds

अशा प्रकारे बनते आंतरराष्ट्रीय चलन

जेव्हा एखाद्या चलनामध्ये जास्तीजास्त परकीय व्यापार केला जातो, तेव्हा त्या चलनाला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून मान्यता मिळते. त्यामुळेच जास्तीतजास्त देशांसोबत भारतीय चलनामध्ये व्यवसाय करण्याचा प्रयत्न भारत करतो आहे. यासाठी भारताकडून अनेक देशांशी भारतीय रुपयामध्ये व्यापार करण्याविषयी करारही केले जात आहे. Trade in Rupees

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/PublicationReportDetails.aspx?ID=331

हे पण वाचा :
Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या
एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट
Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल