INDIA की NDA? ‘एक देश एक निवडणुकीचा’ फायदा कोणाला होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राजकारणात आपली पोळी भाजून घेण्यासाठी विविध कल्पना आखल्या जातात. त्यातीलच एक कल्पना जी सध्या प्रचंड जोर धरतीये, ती म्हणजे ‘एक देश एक निवडणूक’. या संकल्पनेचा फायदा कोणत्या पक्षाला होऊ शकतो. भाजपच्या NDA ला याचा जास्त फायदा होईल कि विरोधकांच्या INDIA आघाडीला होईल असा प्रश्न निर्माण झालाय हे जाणून घेण्यासाठी ऑडियन्स पोल घेण्यात आला त्यामध्ये असे समोर आले की 45% लोकांच्या मते ह्याचा फायदा सर्वच पक्षांना दिसून येतो आहे.

4 हजार 182 लोकांचा केला सर्व्हे

सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी ऑल इंडिया सर्व्हे केला. त्यामध्ये तब्ब्ल 4 हजार 182 लोकांचे मत जाणून घेतले गेले. त्यानुसार 45% लोकांना एक देश एक निवडणुकीचा फायदा सर्वच पक्षांना होईल असे वाटते. 20% लोकांना एनडीये तर 15% उत्तरदात्यांना इंडिया गटाला ह्याचा फायदा होईल असे वाटते. एवढंच नव्हे तर 9 % लोक म्हणतात की ह्याचा फायदा कोणालाच होणार नाही असे वाटते. तर 11% लोकांना सांगता येत नाही असे मत मांडण्यात आले. परंतु एकाचवेळी निवडणुका घेऊन काय फायदा होणार हा प्रश्न समोर उभा ठाकतोच.

एकाचवेळी निवडणुका घेऊन काय फायदा होणार?

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्यास जनतेच्या पैशाची बचत होईल, प्रशासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दलांवरील भार कमी होईल, सरकारी धोरणांची वेळेवर अंमलबजावणी होईल आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक गुंतून राहतील, अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमापेक्षा विकासकामात वेळ देता येऊ शकतो.

निवडणूक आयोगाने 1983 साली सुचवली होती संकल्पना 

वन नेशन वन इलेक्शनची सूचना निवडणूक आयोगाने 40 वर्षांपूर्वी (1983 मध्ये) पहिल्यांदा सुचवली होती. आता 2023 मध्ये, सरकारने या टप्प्याच्या शक्यता आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

वन नेशन वन इलेक्शन यापूर्वी कधी झाले आहे का?

1951 ते 1967 या काळात लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या. 1951-52 मध्ये सार्वत्रिक निवडणुका आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या. यानंतर 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या.