India Pakistan Conflict : आधीच कंगाल पाकिस्तानची जागतिक बँकेकडे ‘मदतीची भीक’ जास्तीच्या कर्जाची याचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

India Pakistan Conflict : भारताने पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण वाढला असून, आता पाकिस्तानने थेट जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक भागीदारांकडे अधिक कर्ज मागण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानच्या आर्थिक सल्लागार विभागाने ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर एक अधिकृत पोस्ट करत ही माहिती दिली. त्यात म्हटलं आहे की, “भारताच्या हल्ल्यांमुळे आणि शेअर बाजारातील घसरणीमुळे पाकिस्तान आर्थिक अडचणीत (India Pakistan Conflict) सापडला आहे. त्यामुळे जागतिक समुदायाने आमची मदत करावी.”

IMF मध्ये आज पाकिस्तानसंदर्भात महत्त्वाची बैठक

पाकिस्तानच्या या कर्जविनंतीनंतर आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. विशेष म्हणजे, भारत IMF चा एक सदस्य आणि महत्त्वाचा भागधारक असल्यामुळे, भारतही या बैठकीत सहभाग घेणार आहे. भारताकडून या वेळी पाकिस्तानचा खरा चेहरा – दहशतवादाचा पाठीराखा – जगासमोर मांडण्याची शक्यता आहे.

भारताकडून विरोधाची तयारी, पण…

भारताने स्पष्ट संकेत दिले आहेत की, पाकिस्तानला आर्थिक मदत म्हणजे जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणं होईल. मात्र, IMF मध्ये अमेरिका आणि चीनसारख्या दोन मोठ्या भागीदार देशांच्या विरोधाची शक्यता नसल्यामुळे, पाकिस्तानला काही प्रमाणात कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारातील धसका, जनतेत गोंधळ (India Pakistan Conflict)

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानमधील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. PSX (Pakistan Stock Exchange) मध्ये गुंतवणूकदारांचा 1.5 अब्ज डॉलर्सचा फटका बसला असून, जनतेमध्ये घबराट निर्माण झाली आहे. सरकारने जनतेला “दृढ राहा” असा संदेश दिला असला तरी, पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.

भारत-पाक संघर्षाचा दणका शेअर बाजाराला! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले

एकीकडे युद्धाची तयारी, तर दुसरीकडे मदतीची भीक पाकिस्तान सध्या दुबळ्या अर्थव्यवस्थे आणि अस्वस्थ राजकारणात सापडला आहे. भारताकडून मिळालेल्या धड्याचा परिणाम आता जगाच्या व्यासपीठावर स्पष्टपणे दिसू लागला आहे.