हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत अनेक दहशतवादी तळ उध्वस्त केले, पाकिस्तानच्या एअरबस वरही हल्ला करण्यात आला… दोन्ही बाजूनी मागच्या ४ दिवसात ड्रोन आणि मिसाईलने घमासान युद्ध झाल्यानंतर अचानकपणे अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम देण्यात आला. मात्र तरीही पाकिस्तानने शास्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचं समोर आल.. सध्या भारत- पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. त्यातच दोन्ही देशातील लष्करी संघर्ष आणखी चिघळू नये यासाठी होणाऱ्या व्यवस्थापनावर आज चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचे लष्करी कारवायांचे महासंचालक अर्थात डीजीएमओ दुपारी १२ वाजता चर्चा करणार आहेत. त्यानंतर भारत आपली भविष्यातील रणनीती ठरणार आहे.
भारताने स्पष्ट केले आहे की पुढच्या वेळी कोणताही दहशतवादी हल्ला हा युद्ध असेल.. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, शनिवारी दुपारी ३:३५ वाजता त्यांनी पाकिस्तानी डीजीएमओशी चर्चा केली. यामध्ये, दोन्ही बाजूंनी १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि हवाई घुसखोरी थांबवण्याचे मान्य केले. हा प्रस्ताव स्वतः पाकिस्तानी डीजीएमओकडून आला होता. त्यानंतर आम्ही असेही ठरवले की १२ मे रोजी दुपारी १२ वाजता आपण पुन्हा चर्चा करू, त्याच पार्श्वभूमीवर आज हि चर्चा होणार आहे. पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे पाकिस्तानी डीजीएमओ कासीफ अब्दुल्लांना जाब विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर यातून काय मार्ग निघतो ते बघणं महत्वाच ठरणार आहे.
दरम्यान, भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, भारताने आपल्या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावेळी पाकिस्तानचे ३५-४० सैनिक सुद्धा मारण्यात आले. पाकिस्तानची काही लढाऊ विमाने पाडण्यात आली. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच्या हवाई संरक्षण रडार आणि हवाई क्षेत्राचे नुकसान झाले आहे. भारताने पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने पाडली, तर दुसरीकडे भारतीय पायलट मात्र सुखरूप माघारी परतल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलं.




