India Pakistan War : युद्धस्थिती!! देशात तेल- इंधन किती शिल्लक आहे? Indian Oil ने दिली मोठी माहिती

India Pakistan War oil and fuel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये खऱ्या अर्थाने आता युद्धाला (India Pakistan War) सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूनी एकमेकांवर मिसाईल, ड्रोन हल्ला करण्यात येतोय. भारतीय सैन्यदलाने वायूदल, हवाईदल आणि पायदळ या तिन्ही आघाड्यांवर पाकिस्तानला इंगा दाखवला आहे. भारत आणि पाकिस्तान मधील हे युद्ध लवकर थांबेल अशी चिन्हे अजिबात दिसत नाहीत. त्यापार्श्वभूमीवर देशात इंधन आणि तेलाचे पुरेसे साठे आहेत का? याबाबत देशवासियांना चिंता लागली होती. परंतु Indian Oil ने ही चिंता दूर केली आहे. देशभरात इंधन आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही असं आश्वासन इंडियन ऑइलने दिले आहे.

पुरेसा इंधन साठा उपलब्ध – India Pakistan War

याबाबत इंडियन ऑइलने ट्विट करत म्हंटल, इंडियन ऑइलकडे देशभरात पुरेसा इंधन साठा आहे आणि आमचा पुरवठा मार्ग सुरळीतपणे सुरू आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून इंधन खरेदी करण्याची गरज नाही. आमच्या सर्व आउटलेटवर इंधन आणि एलपीजी सहज उपलब्ध आहेत. कृपया शांत रहा आणि आमच्या चांगल्या सेवेसाठी अनावश्यक गर्दी टाळा. यामुळे आमचे पुरवठा मार्ग सुरळीत चालू राहतील आणि सर्वांना इंधन मिळेल. कंपनीकडून हि माहिती अशावेळी देण्यात आली आहे जेव्हा सोशल मीडियावर इंधनाच्या संभाव्य कमतरतेबाबत अनेक अफवा पसरत होत्या.

लष्करी कारवाईमुळे (India Pakistan War) इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी भीती लोकांना आहे. परंतु असं काहीही नाही. आपल्याकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कोणतीही कमतरता भासणार नाही असं म्हणत इंडियन ऑईलने देशवासियांना दिलासा दिला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक आहे, जी तेल, वायू, पेट्रोकेमिकल्स आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. इंडियन ऑइलने लोकांना अफवांवर लक्ष देऊ नका आणि कोणत्याही माहितीसाठी अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.