India Pakistan War : कराची बंदरापासून इस्लामाबादपर्यंत…. भारताकडून पाकड्यांचा खेळ खल्लास

India Pakistan War
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानात रात्रभर घमासान (India Pakistan War) बघायला मिळालं. पाकिस्तानने जम्मू काश्मीर आणि सीमेलगतच्या भागात भारतीय नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कराने सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले. सर्वात आधी भारताच्या S-400 एअर डिफेंस सिस्टमनं पाकिस्तानचा हल्ला परतून लावला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर मिसाईल टाकण्यास सुरुवात केली. इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी सारख्या बड्या शहरात भारतीय लष्कराने हाहाकार माजवला. एकामागून एक मिसाईल टाकत भारताने पाकिस्तानला सळो कि पळो करून सोडलं. भारताच्या प्रतिकारापुढे पाकिस्तान पूर्णपणे हतबल झालेलं बघायला मिळालं. तसेच पाक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

कराची बंदर उद्धवस्त – India Pakistan War

एकीकडे इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी सारख्या शहरात ड्रोन हल्ला केल्यानंतर दुसरीकडे पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराची मध्येही भारताने सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठी कारवाई केली आहे. बंदरावर तैनात असलेल्या पाकिस्तानी नौदलाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. भारताने एकामागून एक अनेक क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो आणि ड्रोन हल्ल्यांद्वारे कराची बंदर उद्धवस्त केलं. भारतीय नौदलाच्या हल्ल्याचा केंद्रबिंदू केवळ आर्थिक पायाभूत सुविधांवर नव्हता, तर पाकिस्तानी नौदलाची जहाजे, शस्त्रास्त्रे डेपो आणि टेहाळणी करणारी केंद्रे देखील पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. 14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं. तसेच कराची बंदराचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितलं जात आहे. (India Pakistan War)

भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स युनिटने पाकिस्तानचे 2 F-16 जेटला नियंत्रण रेषेजवळच उद्ध्व्स्त केले आहे. पाकिस्तानच्या 2 पायलटलादेखील ताब्यात घेण्यात आल्याचे बोललं जातंय. पाकिस्तानचा एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र भारताला फार मोठे नुकसान पोहोचवू शकलेला नाही. पाकिस्तानकडून अविरत क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या साहाय्याने हल्ला सुरु असतानाही भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने सर्व मिसाईल्स आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केली होती.