हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India Post GDS Bharti 2025 – 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय डाक विभाग (Indian Post) अंतर्गत मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीतून तब्बल 21,413 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच हि भरती “ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक)” पदासाठी घेण्यात येणार आहे. तरी जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी 03 मार्च 2025 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव (India Post GDS Bharti 2025)-
जाहिराती नुसार “ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक)” या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
जाहिरातीनुसार एकूण 21,413 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क (India Post GDS Bharti 2025) –
इतर उमेदवारांसाठी – Rs 100/-
SC/ST/PWD/महिला उमेदवार/ट्रान्सवुमेन – कोणतेही शुल्क नाही
वेतनश्रेणी –
बीपीएम पदांसाठी – दरमहा 12,000 ते 29,380 रुपये
एबीपीएम/डाक सेवक – दरमहा 10,000 ते 24,470 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 03 मार्च 2025
अटी –
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून दहावी/मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवाराने गणित आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण गुण मिळवलेले असावेत.
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार उच्च वयात सूट दिली जाईल.
लिंक्स (India Post GDS Bharti 2025) –
अधिक माहितीसाठी PDF पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे APPLY करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.