IPPB Bank Alert : पोस्टाच्या पेमेंट बँकेने खातेधारकांना दिला इशारा, म्हणाले….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी एक नोटीस (Bank Alert) काढण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून IPPBOnline च्या नावाने बनावट कॉल करून लोकांच्या खात्यातून पैसे काढून घेतले जात आहेत.

पोस्ट ऑफिसच्या कॉल जॉब देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे ग्राहकांकडून त्यांचे खाते आणि वैयक्तिक तपशील मागवून (Bank Alert) घेतात. तसेच नोकरी देण्याच्या बदल्यात पैशांची मागणीही करतात. यानंतर ते लोकांना वेगवेगळ्या योजनांची लाच दाखवून ग्राहकांची लूट करत (Bank Alert) असतात. त्यामुळे लोकांनी अशा गुन्हेगारांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून खातेधारकांना काही सूचना (Bank Alert) केल्या आहेत. यामध्ये त्यांनी जर तुम्हाला कोणी IPPB च्या नावाने कॉल केला असेल तर विचार न करता तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका. यासोबतच, नोकरीच्या कोणत्याही आश्वासनाच्या फंदात पडण्यापूर्वी, ज्या कंपनीच्या नावाने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती मागवली जात आहे, त्या कंपनीची पहिली सत्यता तपासून बघा. तसेच तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका.कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीला पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी, कंपनी आणि व्यक्तीची सत्यता पडताळून पहा अशा सूचना (Bank Alert) दिल्या आहेत.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट