हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | India Post Recruitment 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. अनेक लोकांची भारतीय टपाल विभागांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांच्यासाठीच ही बातमी आहे. ती म्हणजे आता भारतीय डबल विभाग अंतर्गत एक भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. 14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज भरा.
रिक्त पदांचा तपशील
जब भरती मोहिमेअंतर्गत एकूण 27 कार चालकांची भरती होणार आहे
शैक्षणिक पात्रता | India Post Recruitment 2024
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे जड आणि अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे एवढे असावे.
मासिक पगार
या भरती अंतर्गत पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 63,200 रुपये प्रति महिना एवढा पगार मिळेल.
निवड प्रक्रिया | India Post Recruitment 2024
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ड्रायव्हिंग टेस्ट आणि मोटार मेकॅनिझम टेस्टमध्ये हजर राहावे लागेल. त्यानंतर त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांची निवड होईल. निवडलेल्या उमेदवाराला दोन वर्षाचा प्रोबेशन कालावधी पार करावा लागेल.
अर्ज कुठे करावा ?
“व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू – 560001” या पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टद्वारे पाठवू शकता.