India records 9 lakh cancer deaths | आजकाल आपल्या भारतामध्ये कॅन्सर या रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. हा रोग वेगाने पसरत आहे. आतापर्यंत जर आपण पाहिले तर भारतात गेल्या एक वर्षात या आजाराने जवळपास 9 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच आतापर्यंत 14 लाख लोकांना कर्करोग झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.
याबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आकडेवारी जाहीर केली आहे. भारतात 2022 साली १४.१ नवीन कर्करोग असणारे पेशंट सापडले. तर 9.1 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये असणारा मोठा कर्करोग
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कॅन्सर एजन्सीने तोंड आणि फुफ्फुसाचा पुरुषांमध्ये सर्वात जास्त असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सगळ्यात मोठे आहे.
कर्करोगाचे अनेक प्रकार | India records 9 lakh cancer deaths
हाती आलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये संपूर्ण जगात दहा प्रकारचे कर्करोग आहेत. यांच्या मृत्यूपैकी दोन तृतीयांश आहे. त्यांच्या डेटामध्ये 185 देश आणि छत्तीस कर्करोगांचा देखील समावेश होत आहे. त्यात फुफुसाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे यामध्ये एकूण 12.4 टक्के एवढे लोक आहेत तंबाखूचे सतत सेवन केल्यामुळे या फुफ्फुसाच्या कर्करोगाची संख्या जास्तीत जास्त वाढली चालली आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये असणारा स्तनाचा कर्करोग हा एक मोठा कर्करोग मानला जातो.