नॉटिंगहम | येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने यजमान इंग्लंडचा २०३ धावांनी पराभव केला. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह व ईशांत शर्मा यांनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली. इंग्लंडतर्फे जोस बटलरने केलेले शतक व्यर्थ ठरले. या दौऱ्यातील चौथा सामना ३० ऑगस्ट रोजी खेळवण्यात येईल. मालिकेमध्ये भारत अजूनही १-२ ने पिछाडीवर आहे.