आज भारत Vs पाकिस्तान क्रिकेट सामना!! दिग्गज खेळाडू पुन्हा आमनेसामने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) 2024 मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय वोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. रात्री ८ वाजता इंग्लंड मधील एजबॅस्टन मैदानावर हा रंगतदार मुकाबला सुरु होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत दोन्हीही संघानी आपापल्या सर्व मॅचेस जिंकल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा असेल.

भारत चॅम्पियन्सने पहिल्या सामन्यात इंग्लंड चॅम्पियन्सचा तीन गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा 27 धावांनी पराभव केला. तर पाकिस्तान चॅम्पियन्सने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा पाच गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे दोन्हीही संघ आत्तापर्यंत या सिरीजमध्ये अपराजित राहिले आहेत. टीम इंडियाबाबत सांगायचं झाल्यास, रॉबिन उथप्पा, गुरकीरत सिंग मान आणि इरफान पठाण तुफान फॉर्मात आहेत. तर पाकिस्तानकडून शोएब मलिक, युनिस खान आणि सोहेल तन्वीर यांनी आत्तापर्यंत मॅच विनिंग खेळी खेळली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील खेळाडू दमदार फॉर्मात असल्याने क्रिकेटप्रेमींना आज रंगतदार सामना पाहायला मिळेल.

कुठे खेळला जाईल सामना?
चॅम्पियन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना एजबॅस्टन येथे होणार आहे.

कुठे पाहाल सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग ?
भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल.

मोबाईलवर मॅच कशी बघणार?
मोबाईलवर तुम्ही Sony Liv ॲप किंवा FanCode वर मॅच पाहू शकता.

भारतीय संघ – युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, गुरकीरत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंग, विनय कुमार, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, अनुरीत. सिंग, पवन नेगी.

पाकिस्तान संघ : शर्जील खान, उमर अकमल, युनूस खान, शोएब मलिक, मिसबाह उल हक, शाहिद आफ्रिदी, अब्दुल रज्जाक, वहाब रियाझ, सोहेल तन्वीर, सोहेल खान, अब्दुल रहमान, आमिर यामीन, तौफीक उमर, शोएब मकसूद, यासिर अराफत, तन्वीर अहमद.