हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवाईदलाचे मिग-21 लढाऊ विमान राजस्थानमधील बडमेर जिल्ह्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी अपघातात २ वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हा अपघात एवढा भीषण होता की विमानाने कोसळल्यानंतर जागेवरच पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे भाग अक्षरश: विखुरले आहेत. या घटनेची माहिती मिळताच तेथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
#WATCH | Rajasthan: A MiG-21 fighter aircraft of the Indian Air Force crashed near Barmer district. Further details regarding the pilots awaited pic.twitter.com/5KfO24hZB6
— ANI (@ANI) July 28, 2022
दरम्यान, मिग-21 कोसळल्याची प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. गतवर्षी 24 डिसेंबर रोजी देखील भारतीय हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान राजस्थानमधील जैसलमेरजवळ कोसळले होते. या अपघातात पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला. 21 मे 2021 रोजी पंजाबमधील मोगा येथे मिग-21 विमान कोसळले होते. यामध्ये पायलट अभिनव शहीद झाले होते.