‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक पोस्ट व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ज्या खेळाडूंना टीम इंडियामधून राष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खेळताना आपली चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्यांना टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाही. यापैकीच एक गोलंदाज म्हणजे अनुरीत सिंग (Anureet Singh).

https://www.instagram.com/p/Ci97K1FrsCH/?utm_source=ig_embed&ig_rid=8fa850f3-314a-41c1-88fc-fd1841c68f65

वेगवान गोलंदाज अनुरीत सिंगने (Anureet Singh)याने आज राष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृ्त्ती जाहीर केली आहे. त्याने मागच्या कित्येक वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती त्याचा स्वतःचा एक चाहता वर्ग आहे. त्याने बडोदा, सिक्कीम या संघांकडून क्रिकेट खेळत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

अनुरीत सिंगने (Anureet Singh) आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, केकेआर आणि राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. त्याने (Anureet Singh) सोशल मीडियावरती आपली भावनिक पोस्ट लिहीत आपली निवृत्ती जाहीर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आत्तापर्यंत ज्यांनी मला खेळायचं कसं शिकवलं, त्यांना मी शुभेच्छा देतो असे म्हणत मुरली विजय, संजय बांगर आणि अभय शर्मा यांचे आभार मानले आहेत.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर