भारतीय व्यक्ती चंद्रावर उतरणार!! केंद्रीय मंत्र्यांनी वेळही सांगितली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या वर्षी भारताने चांद्रयान ३ या मिशनच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकलं. आताही जर सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं तर २०४० पर्यंत माणूस सुद्धा चंद्रावर उतरेल असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला आहे. तसेच २०३५ पर्यंत भारत एक अंतराळ स्टेशन उभारेल अशी माहितीही त्यांनी दिली.

जितेंद्र सिंह (Jitendra Singh) म्हणाले, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकार कडून अवकाश क्षेत्रासाठी ज्या काही मोठंमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्या भविष्याचा विचार करूनच करण्यात आल्यात. यावेळी त्यांनी सांगितलं कि 2025 च्या उत्तरार्धात भारतीय अंतराळवीराला अंतराळात पाठवण्याची आणि 2040 पर्यंत चंद्रावर पहिल्या भारतीय नागरिकाला उतरवण्याची आमची योजना आहे. जर ठरल्याप्रमाणे सगळं झालं तर नक्कीच २०४० पर्यंत माणूस सुद्धा चंद्रावर उतरेल असा विश्वास जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

जितेंद्र सिंह पुढे म्हणाले, आम्ही 2023 पर्यंत 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक बघितली. पुढील 10 वर्षांत अंतराळ अर्थव्यवस्था पाचपट किंवा सुमारे $44 अब्ज वाढेल असा अंदाज आहे. यावेळी त्यांनी गगनयान मोहिमेबद्दलही माहिती दिली. गगनयान पुढील वर्षी अंतराळात जाईल तसेच यासोबतच भारताने रोबोट फ्लाइट पाठवण्याचेही लक्ष्य ठेवले आहे. 2025 मध्ये वायुमित्र या महिला रोबोटला अवकाशात पाठवले जाईल. हा रोबोट अंतराळवीराच्या सर्व हालचाली पार पाडेल आणि पृथ्वीवर परत येईल असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.