शेतकऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करा, अन्यथा आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा : विक्रम वाघ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सध्या राज्यभरात जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. या आधारे सरकारने शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांना देखील पेन्शन योजना सुरू करावी, अन्यथा आमदार आणि खासदार यांची पेन्शन योजना बंद करावी, अशी मागणी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी म्हणाले.

सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना आज भारतीय मराठा महासंघाच्यावतीने निवेदन देण्यात आले. यानंतर जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज सर्व शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, आज शेतकऱ्यांचा कोणीही विचार करताना दिसून येत नाही.

शेतकरी हा सुशिक्षित, बेरोजगार यांचा जर विचार केला तर सरकार असे म्हणत आहे की, देश हा कृषी प्रधान आहे. मात्र, देश कृषी प्रधान असताना शेतकऱ्याचे चाललेला हाल आपण पाहिले तर देशात सुशिक्षित बेरोजगारांचे देखील प्रमाण वाढत आहे. आज मुलांची वय झाले तरी त्यांना नोकरी मिळत नसून त्यांचे लग्नही होत नसल्याचे दिसते.

अशा मुख्य प्रश्नांबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच अनियमितपणे जो पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्याला कोणालाही जबाबदार धरले जात नाही. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आज मेटाकुटीला आला आहे. पैशांअभावी त्यांच्या मुलांची शिक्षण होत नाही. त्यामुळे या गोरगरीब शेतकऱ्याला देखील पेन्शन सुरु करावी. अन्यथा आमदार खासदारांचीही पेन्शन बंद करावी, असे वाघ यांनी म्हंटले.